भडकंबा येथे विद्युत वाहिनीचा शॉक लागून बैलाचा मृत्यू

0

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा पेठवाडीतील अनिल दत्ताराम लाड यांचा बैल चरायला गेला असता विद्युतभारित वाहिनीचा शॉक लागून मृत्युमुखी पडल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अनिल लाड यांच्या घराजवळील वाडीतील शेतात बैल चरत असताना विद्युत तारा एकमेकांना चिकटल्या. त्याचा विद्युत प्रवाह तारांतून उतरल्याने बैलाचा चरता चरता या तारांना स्पर्श झाला. बैल जागीच गतप्राण झाला असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण कुंकवळेकर यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच वीज मंडळाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन वीज प्रवाह बंद केला. ऐन शेतीच्या हंगामात बैलाचा मृत्यू झाल्याने लाड यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:27 PM 21-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here