साखरपा ग्रामपंचायततर्फे निर्जंतुकीकरण मोहीम

0

साखरपा : साखरपा ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या परिसरातील शासकीय इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. नुकतीच ही मोहीम राबविण्यात आली. साखरपा आणि परिसरामध्ये राबविण्यात आलेल्या या निर्जंतुकीकरण मोहिमेमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, तळवाडी अंगणवाडी, साखरपा शाळा क्रमांक २, पोलिस ठाणे व महात्मा गांधी विद्यालय, साखरपा येथे औषधाची फवारणी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे ग्रामपंचायतीतर्फे सांगण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:33 PM 24-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here