घरफोडी करून ९५ हजाराचा ऐवज चोरणाऱ्याला अवघ्या पाच तासात अटक

0

खेड : उधळे येथे घरफोडी करून ९५ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या चोरट्याला अवघ्या पाच तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोडीमधील मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. व्यवसायाने कुक असलेल्या सुदेश गणपत महाडीक (वय ३५, रा. वाळंजवाडी, कळंबणी, ता. खेड) असे ताब्यात चोरट्याचे नाव आहे. गेल्या २० जून रोजी सायंकाळी ७ ते रात्री ११.३० या दरम्यान फिर्यादी ऋतुजा राजेंद्र वेसवीकर (रा. उधळे, जनाई गावदेवी मंदिराच्या बाजूला, साई ढाबा, ता.खेड, जि.रत्नागिरी) यांच्या घरात अज्ञात चोरट्याने चोरी केली. घरातील किचनच्या पाठीमागील खिडकीवाटे घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि गोदरेजचा डबा असा एकूण ९५ हजार ३०० रुपये किमतीचा ऐवज त्याने चोरून नेला होता. याबाबत गुरुवारी खेड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानंतर चोरट्याला पोलिसांनी अवघ्या पाच तासांत ताब्यात घेतले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:03 PM 25-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here