ए.आर. रेहमानच्या गाण्यामुळे मंत्री रविशंकर प्रसाद यांचं अकाऊंट ब्लॉक, ट्वीटरचं स्पष्टीकरण

0

नवी दिल्ली : यूएस डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्यांतर्गत ट्विटरने काल केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक केले होते. यानंतर, रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं की, ट्विटरची मनमानी आणि असहिष्णुता म्हणत त्यांना केवळ त्यांचा अजेंडा चालवण्यात रस आहे. आता ट्विटरची प्रतिक्रियाही या प्रकरणात समोर आली आहे. ट्विटरने म्हटले आहे की जेव्हा कॉपीराईटबद्दल कायदेशीर तक्रारी प्राप्त होतात तेव्हा अशी कारवाई केली जाते. प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांचं प्रसिद्ध गाणं ‘माँ तुझे सलाम’ वर ट्विटरने सोनी म्युझिक एंटरटेनमेंट कंपनीकडून कॉपीराइट क्लेम मिळाल्याचा दावा केला आहे. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने आपल्या स्पष्टीकरणात असे म्हटले आहे की अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट अक्टच्या नोटीसनंतर रविशंकर प्रसाद यांचे अकाऊंट तात्पुरते ब्लॉक करण्यात आले होते.ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले की, ज्या ट्वीटमुळे हे प्रकरण समोर आले आहे त्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याच वेळी प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही पुष्टी करतो की डीएमसीएच्या नोटीसनंतर माननीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे खाते तात्पुरते ब्लॉक केले गेले होते. ज्या ट्वीटमुळे हे झालं ते ट्वीटही काढून टाकले गेले आहे. आमच्या पॉलिसीनुसार, कोणत्याही सामग्रीच्या कॉपीराईटबाबत मालक किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीकडून वैध तक्रार प्राप्त झाल्यावर त्यावर कारवाई केली जाते.

ट्विटरने ‘डीएमसीए नोटीस टू ट्विटर’ अशा शीर्षकाने उत्तर दिलं आहे. यात ट्विटरने म्हटले आहे की, या ट्वीटवर सोनी म्युझिक एंटरटेनमेंट कंपनीने कॉपीराईट क्लेम केला आहे. त्यांनी सांगितले की ट्वीटमध्ये दिलेल्या क्लिपमध्ये संगीतकार ए.आर. रहमान यांचे प्रसिद्ध गाणे ‘माँ तुझे सलाम’ वापरण्यात आले आहे. ज्यानंतर या ट्वीटवर म्युझिक कंपनीने कॉपीराइटचा क्लेम केला होता. आमच्या कॉपीराइट पॉलिसी अंतर्गत ट्विटरने आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या खात्यावर तात्पुरती एक तासासाठी बंदी घातली होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:31 PM 26-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here