सुप्रिया सुळे यांनी घेतले दोन अनाथ मुलींचे पालकत्व

0

पुणे : कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हिरावलेल्या दोन्ही मुलींचे पालकत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वीकारले आहे. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची दखल घेत सुप्रिया सुळे यांनी आई-वडिलांच्या मायेला मुकलेल्या या चिमुकल्यांना मायेचा आधार दिला आहे. जेजुरीमधल्या घोणे कुटुंबातील दोन मुलींच्या आई-वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले. त्या दोघींमधील एकीचे वय साडेचार वर्षे आणि दुसरीचे केवळ दीड वर्षे आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर दोघींचीही जबाबदारी वयोवृद्ध आजी-आजोबांवर आली. ही बातमी माध्यमांमध्ये आल्यानंतर या दोघींचे पालकत्व स्वीकारणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. या मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आमचं कुटुंब घेत आहे. जेजुरीतील आमचे सहकारी दिलीपदादा बारभाई तातडीने कोणाला तरी तिथे पाठवत आहेत. पाठपुरावा करून त्यांच्या आजी-आजोबांना कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने त्यांची जबाबदारी आम्ही घेत आहोत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने आपली वेळ जरी दिली तरी त्यांना आधार मिळेल, असेही त्या म्हणाल्या

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:55 AM 26-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here