सिंधुदुर्ग: कोरोनामुळे कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झालेल्या अनुसूचित जातीतील कुटुंबाला व्यवसायासाठी कर्ज योजना

0

सिंधुदुर्ग : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत कोरोनामुळे अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झालेल्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यासाठी स्माइल ही व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक एस. आर. म्हसकर यांनी दिली. येत्या दोनच दिवसांत विहित नमुन्यातील अर्ज भरावयाचे आहेत. याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, या योजनेची माहिती, अटी आणि शर्ती अशा – पात्रता – अर्जदार अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपर्यंत असावे, अर्जदार करोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबप्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा. (कुटुंबप्रमुखाच्या रेशनकार्डवर त्या सदस्याचे नाव असणे बंधनकारक), मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा १८ ते ६० च्या दरम्यान असावी, मृत्यू पावलेल्या कुटुंबप्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. करोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीकरिता पुढीलपैकी एक दस्ताऐवज आवश्यक आहे. महानगरपालिका, नगरपालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र (मृत्यू १५ जून २०२१ पर्यंत), स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती, एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गटविकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र. याशिवाय पुढील कागदपत्रे जोडण्याची आवश्यकता आहे – मृत व्यक्तीचे नाव, पत्ता, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (३ लाखांपर्यंत) करोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूदाखला, रेशन कार्ड, वयाचा पुरावा. करोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने ही माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा https://forms,gle/7mG8CMeeLknWGt6K7 या लिंकवर येत्या ३० जूनपर्यंत भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:53 PM 29-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here