पुष्कर सिंह धामी होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

0

डेहराडून : तीरथ सिंह रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर उत्तराखंडच्या नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा झाली आहे. उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्याचे 11 मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी आज संध्याकाळी सहा वाजता शपथ घेणार आहेत.

पुष्कर सिंह धामी हे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. तसेच, ते आरएसएसचे जवळचे मानले जातात. पुष्कर सिंह धामी हे ऊधमसिंह नगर जिल्ह्यातील खटीमा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पक्षातील तरुण आणि अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख आहे.

पुष्कर सिंह धामी, माजी प्रदेशाध्यक्ष बिशनसिंग चुफल किंवा त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यापैकी कोणीही उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड केली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. दरम्याान, तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर दुपारी तीन वाजता देहरादूनमध्ये भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलविण्यात आली आहे. अखेर या बैठकीत पुष्कर सिंह धामी यांचे नाव उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाले.

तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्या संबंधित बातम्या येत होत्या. उत्तराखंडमध्ये पुन्हा मुख्यमंत्री बदलू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर तीरथ सिंह रावत यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी संध्याकाळी तीरथ सिंह रावत यांनी राज्यपाल बेबी रानी मौर्य यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.

दोन जागा रिक्त
उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या दोन जागा गंगोत्री आणि हल्द्वानी रिक्त आहेत. तेथे पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. मात्र राज्यात पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात निवडणूक होणार असल्याने सदस्यत्वाचा एका वर्षापेक्षा कमी कालावधी उरला आहे. अशा परिस्थितीत कायदेतज्ज्ञांच्या मते निवडणूक घेणे हे निवडणूक आयोगाच्या म्हणण्यावर अवलंबून असेल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:37 PM 03-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here