एमपीएससी परीक्षार्थीच्या आत्महत्येने संताप; ‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’ म्हणत घेतला गळफास

0

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळाल्याच्या तणावातून स्वप्निल सुनील लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राज्यात सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे. स्वप्निलने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’ असे म्हटले आहे. स्वप्निलने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली होती. स्वप्निलचे आईवडील हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडेचार वाजता घरी आली. तेव्हा स्वप्निलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. स्वप्निल २०१९ च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे त्याची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्वपरीक्षा तो उत्तीर्ण झाला होता. कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या ‘सुसाईड नोट’वरून दिसून येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:25 AM 05-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here