ठाकरे सरकार म्हणजे तालिबानी सरकार : आशिष शेलार

0

मुंबई : सभागृहाची आयुधे गोठवणे, तारांकित प्रश्न व्यपगत करणे, हरकतीच्या मुद्द्यांवर बोलू न देणे, याबाबत संताप व्यक्त करणारे भाजप सदस्य जेव्हा अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत गेले त्यावेळी त्यांना मागे आणण्यासाठी गेलो असताना, अध्यक्षांच्या दालनात कोणत्याही प्रकारची शिवीगाळ झालेली नसताना, उलट पक्षाच्या वतीने मी तालिका अध्यक्षांची स्वतः क्षमा मागितली असतानाही मला निलंबित केले गेले. ही ठाकरे सरकारची तालिबानी वृत्ती आहे, अशा शब्दांत भाजपचे विधानसभेतील प्रतोद आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभेत जेव्हा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींचा ठराव मांडला त्यावेळी त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी दाखवून ओबीसी समाजाचे नुकसान होऊ नये, म्हणून आपण हरकतीचा मुद्दा मांडून बोलू इच्छित होतो; पण त्यावर बोलू दिले नाही. भुजबळ यांनी आपल्या वक्तव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी जे विधान केले, त्याबद्दल हरकत घेऊ इच्छित असताना तालिका अध्यक्षांनी बोलू दिले नाही. पंतप्रधानपद आणि नरेंद्र मोदी यांच्याविषयी गैरसमज पसरवणारी विधाने मंत्र्यांनी केली ती कामकाजात राहू नये, ही बाब लक्षात आणून देण्यासाठी बोलू द्यावे, अशी मागणी मी वारंवार करीत होतो; पण आमदारांना बोलू न देता लोकशाहीचा गळा घोटला, असेही शेलार म्हणाले.

माझ्या सोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सभागृहात सामना करू शकत नाहीत. त्यांनी ‘नो बाॅल’वर माझी अशी विकेट काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण मी क्रिकेट खेळणारा आहे आता जनतेमध्ये जाऊन या तालिबानी कारभार करणाऱ्या पक्षांना उघडे पाडू.
– आशिष शेलार, निलंबित आमदार

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:38 PM 06-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here