शिवसेनेने करून दाखवलं : ना. उदय सामंतांच्या पुढाकाराने एका दिवसात रत्नागिरीतील १७९० तरुणांचे लसीकरण

0

◾ लसिकरणात अडथळे आणणाऱ्यांच्या डोळ्यात सेनेने घातले अंजन

➡ रत्नागिरी : कोरोना संसर्गाच्या बचावासाठी आवश्यक खबरदार व लसीकरण हेच दोन प्रभावी मार्ग असल्याचे तद्यांनी सांगितले आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे जलद गतीने लसीकरण व्हावे यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे प्रचंड प्रयत्नशील असल्याचे दिसत आहेत. शासनाच्या लसीकरण कार्यक्रमानुसार अनेक तरुणांना लस मिळत नव्हती. हि गरज ओळखून शिवसेनेच्या माध्यमातून तरुणांचे लसीकरण करण्याचा अभिनव उपक्रम ना. समंत यांनी आपल्या मतदारसंघात राबवला आहे. संपूर्ण महराष्ट्रात आदर्शवत असा हा उपक्रम ठरला असून आज पहिल्याच दिवशी १७९० युवक, युवतींचे लसीकरण पार पडले आहे. रत्नागिरी शहरातील ५ केंद्रांवर हा उपक्रम पार पडला. याची शुभारंभ प्रसंगी ना. उदय सामंत, खा. विनायक राउत, नगराध्यक्ष बंड्या साळवी, नगरसेविका स्मिताल पावसकर, निमेश नायर आदी उपस्थित होते. काही पक्षांचे युवा पदाधिकारी लसीकरण कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्यात गुंतलेले असताना शिवसेनेच्या युवा सेनेने या उपक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन करीत अडथळे आणणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातल्याची चर्चा जनमानसात रंगली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
04:18 PM 07/Jul/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here