नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतील केंद्रीय तपास संस्था सीबीआय (सीबीआय) च्या मुख्यालयाला गुरुवारी सकाळी आग लागली. अचानक आग लागल्याने सीबीआयचे सारे अधिकारी इमारती बाहेर आले आहेत. इमारतीमध्ये धुराचे लोट असून अग्निशामन दल पोहोचले आहे. फायर ब्रिगेडच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. सीबीआयचे हे कार्यालय दिल्लीच्या लोधी रोडवर आहे. आग कशी लागली, कोणत्या फ्लोअरवर लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
12:58 PM 08-Jul-21