ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक अशोक जीवतोडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

0

चंद्रपूर : राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा तापला असताना चंद्रपूर जिल्ह्यातून एक मोठी राजकीय घडामोड पुढे आली आहे. विदर्भाच्या शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलाय. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. या सोहळ्याला प्रांताध्यक्ष जयंत पाटील , उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील उपस्थिती होती.

मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठान येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. चंद्रपूर आणि विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज असलेले प्रा. डॉ. जीवतोडे यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीने भाजपशी जवळीक असलेला एक मोहरा आपल्यात ओढून घेतल्याचे बोलले जात आहे. विदर्भाच्या विविध जिल्ह्यात पसरलेल्या शिक्षण संस्था आणि ओबीसी महासंघाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर कामाची छाप असलेले डॉ. जीवतोडे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात एक दमदार चेहरा मिळाला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:12 PM 14-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here