धामापूर येथे बंधाऱ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

0

संगमेश्वर : तालुक्यात धामापूर येथे रविवारी सायंकाळी 4 वा. सुमारास दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या बाबत अधिक माहितीनुसार माखजन जवळच्या धामापूर घारेवाडीतील सहा तरुण भायजेवाडीतील बंधाऱ्याजवळ गेले होते. याचदरम्यान शौचास जात असल्याचे सांगून शैलेश दत्ताराम चव्हाण (32) व केतन सुरेश सागवेकर (18) हे दोघे बांधाऱ्याजवळच्या पाण्यात गेले. याच दरम्यान केतन सुरेश सागवेकर याचा पाय घसरुन तो पाण्यात बुडू लागल्याचे लक्षात येताच शैलेश चव्हाण हा त्याला वाचवायला गेला, परंतु तोही बुडू लागल्याने त्याने आरडाओरडा केल्यावर तेथे असणाऱ्या चौघांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले. या दोघांचा जागीच मृत्यू झाला. याची खबर गावातील लोकांना समजताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. संध्याकाळी दोघांचे मृतदेह माखजन प्रा. आ. केंद्रात आणण्यात आले. मृतदेहाचे विच्छेदन डॉ. प्रदीप शिंदे यांनी केले. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे धामापूर घारेवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:19 AM 19-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here