मुंबईत पाणी भरल्याने कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना फटका

0

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे रुळांवर पाणी साचल्यामुळे कोकण रेल्वेमार्गे धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस रविवार तसेच सोमवारची जनशताब्दी एकस्प्रेस रद्द करावी लागली तर या गाडीसह एकूण नऊ रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर विपरित परिणाम झाला. या बाबत कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी लोकेंद्र कुमार वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी भरल्याने मध्य रेल्वेने रविवारी 18 जुलै रोजी पहाटे मुंबईतून सुटणारी मुंबई सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी विशेष गाडी (01151) तसेच सोमवारी दि. 19 रोजी मडगावहून मुंबईला येणारी (01152) जनशताब्दी विशेष एक्स्प्रेस गाडी रद्द करण्यात आली आहे. याचबरोबार दोन दिवसांपूर्वी दक्षिण रेल्वेच्या अखत्यारित रेल्वे मार्गावर कोसळलेल्या दरडीमुळे 19 जुलै रोजीची लो. टिळक टर्मिनस -कोचुवेली (06163) द्विसाप्ताहिक एकस्प्रेस तसेच 20 जुलैची लो. टिळक टर्मिनस तिरुवअनंतरपुरम नेत्रावती डेली स्पेशल गाडी रद्द करण्यात आली आहे. याबाबत कोरे कडून रविवारी सायंकाळी उशिरा प्राप्त माहितीनुसार वरील तीन गाड्यांशिवाय मंगळुरु जंक्शन.-मुंबई सीएसएमटी (01134), एर्नाकुलम – अजमेर (02977), तिरुनेलवेल – जामनगर (09577), लो. टिळक टर्मिनस – तिरुवअनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस (06345), लो. टिळक टर्मिनस – मंगळुरु एक्स्प्रेस (02619) तसेच मुंबई सीएसएमटी – मंगळुरु (01133) या गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम झाल्याने रेल्वेने त्यांच्या सुधारित वेळा जाहीर केल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:50 AM 19-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here