स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला राज्य पतसंस्था फेडरेशनचा प्रथम क्रमांकाचा ‘दिपस्तंभ पुरस्कार’ घोषित

0

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा सन २०१९-२० साठीचा दिपस्तंभ पुरस्कार घोषित झाला आहे. सलग ५ व्या वर्षी हा पुरस्कार पतसंस्थेला प्राप्त झाला आहे. १०० कोटींच्या पेक्षा अधिक ठेवी असलेल्या संख्या गटात प्रथम क्रमांकाने संस्थेला गौरवण्यात आले आहे. स्वरूपानंद पतसंस्थेने महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत दिपस्तंभाप्रमाणे कार्य करून पतसंस्था चळवळीला चांगली दिशा दर्शवली आहे. केलेल्या या दिशादर्शक कार्याबद्दल दिपस्तंभ पुरस्कार प्रदान करत असल्याचे संस्थेला प्राप्त पत्रात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला आर्थिक शिस्त व विश्वासहार्यता जपत सातत्याने आपले आर्थिक व्यवहार वाढवत नेले. नवनवीन संकल्पना उपक्रम राबवत पतसंस्थेला जनमानसात समिप ठेवले भक्कम आर्थिक स्थिती, निकषांची परिपूर्ती, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, कार्यविस्तार, व्यावसायिक दृष्टिकोन आणि सहकार तत्व याच संतुलन ठेवत केलेले व्यवहार ही पतसंस्थेची शक्ती स्थान राहिली. व्यापक जनाधार असलेली स्वरूपानंद पतसंस्था सलग ५ व्या वर्षी ह्या दीपस्तंभ पुरस्काराची मानकरी ठरत आहे याचा सार्थ अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया स्वरूपानंदचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली. दिनांक २४ जुलै रोजी शिर्डी येथील समारंभात राज्याचे सहकार मंत्री महोदय ना. पाटील यांचे हस्ते दीपस्तंभ पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
4:41 PM 20-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here