राष्ट्रसेवादल पुरग्रस्त सेवापथक चिपळूण-संगमेश्वर पूरग्रस्त भागात कार्यरत

0

रत्नागिरी : महापूराने संपुर्ण चिपळूण बाजारपेठ उद्धवस्त झाली आहे. या पूरग्रस्त भागात आज राष्ट्रसेवादल सेवा पथकाने श्रमदान करत डॅा. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय चिपळूण येथील पुस्तकांना जीवदान दिले. तसेच मातृमंदिरच्या सहकार्याने पेठ माप येथील पूरग्रस्त कुटूंबांना जीवनावश्यक वस्तू कीटचे वाटप केले. गेल्या ४० वर्षातील पुर पातळीच्या सीमा ओलांडत वसिष्ठीचा महाप्रलय चिपळूण आणि परिसर उध्वस्त करुन गेला. बाजारपेठ आणि खेर्डी, पेठ माप परिसरांत १६-१७ फुट पाणी होते. या पुरग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी राष्ट्रसेवादलाचे सेवा पथक आज चिपळूण येथे दाखल झाले २५ युवक-युवतींनी चिपळूण शहरातील अत्यंत पुरातन आणि अफाट ग्रंथसंग्रह असणारे डॅा बाबांसारखे आंबेडकर नगर वाचनालयांतील पुराने साचलेला चिखल माती दूर केला, त्यांतील चांगली असणारी पुस्तके वेगळी काढली. या पुरात अत्यंत दुर्मिळ पुस्तके, संग्रह, काही दुर्मिळ ग्रंथ उर्दु पुस्तके उध्वस्त झाल्याचे आढळले. यांतील शिल्लक पुस्तकांते जतन करतांनाच हे वाचनालय पुर्वीप्रमाणेच समृध्द करण्यासाठी सेवादल प्रयत्न करेल असे राष्ट्रसेवादलाचे अभिजित हेगशेट्ये यांनी वाचनालयाचे अध्यक्ष खेडेकर यांना सांगितले. यावेळी पेठ माप येथील पुरग्रस्तांसाठी काही जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटण्यात आले. येथील लोकांची उध्वस्थ परिस्थिती पहाता येथे फार मोठ्या मदतीची गरज आहे. आज रत्नागिरी, खेड, मालवण, देवरुख या परिसरातून अनेक सेवा मंडळे जीवनावश्यक वस्तू आणि पाणी बाटल्या मोठ्या प्रमाणावर आणतांना दिसत आहेत. मात्र जे पुढे येतात त्यांच्या पर्यंतच ते पोहोचत आहे. कोकणी माणूस हा मुळत:च अत्यंत स्वाभिमानी आहे. जाऊन मदत घेणे आणि ती ही मागून घेणे हा त्याचा स्वभाव नाही. त्यामुळे या धुवांधार पावसात अनेक कुटूंबे आपल्या पडक्या आणि सर्वस्व वाहून गेलेल्या घरात गेले ४ दिवस नेसत्या वस्त्रानिशी कुडकुडत बसले आहेत. मुख्यमंत्र्यांसमोर एक महिला धारिष्ठ्य करत अनावर झाली तर तीला ही दरडवण्यात आले. आज येथे येणाऱ्या मदतीचे नियोजन शासन आणि प्रशासनाने नियंत्रित करणे गरजेचे आहे ज्या योगे ते जेथे आवश्यक तेथे पोहोचू शकेल. राष्ट्रसेवादल माध्यमातून पुणे, मुंबई, सांगली, औरंगाबाद, रत्नागिरी येथून मदत येत आहे. याचे योग्य नियोजन व योग्य व्यक्तिपर्यंत ती पोहोचावी यासाठी राष्ट्रसेवादलाने चिपळूण येथे रमाकांत सकपाळ यांचे येथे संपर्क कार्यालय सुरु केले आहे. सध्या जीवनावश्यक वस्तू कीट या सोबतच चादर, ब्लॅंकेट, सतरंजी, मेणबत्ती, सौर उर्जा दिवे, फिनेल, कपडे गाऊन शॅार्टस (नवे जूने नकोत) टॅार्च असे गरजेचे आहे. यासाठी अभिजित हेगशेटये ९४२२०५२३१४,सतीश शिर्के. ९३७०६६८४८३, आत्माराम मेस्त्री. ८९९९२७६४८२,रमाकांत सकपाळ ९४२३२९३९८५, सुनिता गांधी. ७२१८८९४८२३ यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यंत भीषण नैसर्गिक आपत्तीत दुर्गम खेड्यतील आणि वस्तीतील उध्वस्त कुटुंबाना सध्य परिस्थितीत किमान गरजां भागविण्यासाठी आधार राष्ट्रसेवादला मार्फत देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी अनेकांना आर्थिक अथवा वस्तूरुपाने योगदान देण्याची इच्छा आहे. मातृमंदिर या सहयोगी संस्थेचे सहकार्य घेत आहोत. या कामी आपणही आपलं योगदान देऊ शकता.
A/c Name : Matrumandir Devrukh
A/C no.
029011100004197
IFSC CODE ASBL0000029
Apna Sahakari Bank Ltd, Devrukh
इच्छुकांनी निधी सदरील खात्यावर जमा करण्याचे आवाहन राष्ट्रसेवादल सेवा पथकातर्फे करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:16 PM 26-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here