संगमेश्वर तालुक्यातील कुळे धनगरवाडीत घरांना, रस्त्याला भेगा

0

संगमेश्वर : तालुक्यात कोळंबे पाठोपाठ कुळे व देवोळे धनगरवाडीत भूस्खलन झाले असून 5 घरे खचली आहेत. घरांच्या भिंती कोसळल्या असून रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. धनगरवाडीला जोडणारा 500 मीटर रस्ता खचल्याने वाड्यांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे नायरी व आरवली घाटातील डोंगर खचला आहे. 5 दिवसांपूर्वी कोळंबे आंबेकरवाडीत मोठे भूस्खलन होऊन येथील शेतीला धोका पोहोचला होता आता कुळे व देवोळे धनगरवाडीत भूस्खलन झाल्याने येथील घरांना धोका पोहोचला आहे. वाड्यांना जोडणाऱ्या रस्ता 500 मीटर खचला असून रस्त्याला भेगा पडल्या आहेत. शेतीमध्येही भूस्खलन झाले असून शेतीचे मोठे नुकसान झाले. 5 घरांना धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थांचे शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. भूस्खलनामध्ये वाडीतील काशिराम गंगाराम शेळके, सखाराम शेळके, धोंडू शेळके, परशुराम शेळके, यशवंत शेळके, तुकाराम शेळके, बाबू शेळके, राजाराम शेळके, रमेश शेळके, पांडुरंग शेळके, शांताराम शेळके, सुनंदा शेळके, काशिराम शेळके, सावित्री शेळके यांचे नुकसान झाले. घरांना धोका निर्माण झाला असल्याचे समजल्यानंतर देवोळे व कुळे धनगरवाडीत जि .प.सदस्या माधवी गीते यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी मनोहर गीते, शिवसेना विभागप्रमुख राजू साळवी, देवोळे सरपंच व कुळे सरपंच यावेळी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:28 PM 29-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here