जिल्ह्यात कोरोनामुळे आज २८ जणांच्या मृत्यूची नोंद

0

रत्नागिरी : जिल्ह्यात आज १९२ रुग्ण जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोनामुक्तांची संख्या ६७ हजार ७ झाली आहे. कोरोनामुक्तांची टक्केवारी ९४.०२ झाली आहे. आज नव्या २८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

आज नवे २१८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. आजच्या रुग्णांचा तपशील असा –

आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या तीन हजार ६२७ नमुन्यांपैकी तीन हजार ५०९ अहवाल निगेटिव्ह, तर ११८ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या दोन हजार ४८९ पैकी दोन हजार ३८९ अहवाल निगेटिव्ह, तर १०० पॉझिटिव्ह आले. दोन्ही मिळून २१८ पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७१ हजार २६७ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख ९ हजार ८७६ जणांची कोरोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

सध्या दोन हजार २६ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ५७९, तर लक्षणे असलेले ४४७ रुग्ण आहेत. एक हजार २२ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ५२२, डीसीएचसीमधील २२९, तर डीसीएचमध्ये २१८ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १६७ जण ऑक्सिजनवर, ७५ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. आजच्या तीन आणि यापूर्वीच्या २५ अशा एकूण २८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील २.८२ हा मृत्युदर वाढून आज तो २.८९ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या दोन हजार ६१ एवढी आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या एक हजार ७२५, तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ७४९ आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३१, दापोली १८०, खेड १८३, गुहागर १५३, चिपळूण ३९२, संगमेश्वर १८१, रत्नागिरी ७०१, लांजा १०९, राजापूर १३१. (एकूण २०६१).

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
9:19 PM 30-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here