संभाजीराजे छत्रपती केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डींच्या भेटीला, रायगडावरील कामांना गती देण्याची मागणी

0

नवी दिल्ली : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज नवनिर्वाचित केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेतली. यावेळी रायगड विकास प्राधिकरण मार्फत रायगडावर सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी मंत्री महोदयांना दिली. रायगड विकास प्राधिकरणाने भारतीय पुरातत्त्व विभागाला 2018 साली 11 कोटी रूपयांचा निधी दिलेला आहे. त्यापैकी पुरातत्त्व विभागाने गेल्या साडे तीन वर्षांत केवळ 60 लाख रूपयांचीच कामे केलेली आहेत. तर उर्वरीत निधी तसाच पडून आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने उत्खनन व जतन संवर्धनाची कामे अजूनही हाती घेतलेली नाहीत. केवळ सहाच ठिकाणी उत्खनन करण्यात आलं आहे. इतर वाड्यांच्या उत्खननाची कामे हाती घेतलेली नाहीत. तरी, या कामांना गती देऊन निश्चित वेळेत ती पूर्ण करावीत, याबाबत संभाजीराजे आणि रेड्डी यांच्यामध्ये चर्चा झाली.रायगडावरील हत्ती तलाव आणि इतर पाणवठे, महादरवाजा तटबंदी, नाणे दरवाजा यांचं जतन आणि संवर्धनाची कामे मागील चार वर्षांत प्राधिकरणाच्या मार्फत सुरू आहेत. तसेच फरसबंद, पायरीमार्ग, स्वच्छतागृहे, भूमिगत विद्युत वाहिन्या अशी विकासात्मक कामेदेखील प्राधिकरणामार्फत सुरू आहेत, याबाबत मंत्री रेड्डी यांना संभाजीराजे यांनी सविस्तर माहिती दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:21 PM 30-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here