माजी पालकमंत्री आ. रवींद्र वायकर यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

0

खेड : कोकणात आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. खेड बिरमणी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून जयवंत भाऊराव मोरे व ललिता जयवंत मोरे या पती-पत्नीला आपला जीव गमवावा लागला. याची माहिती कळताच पूरग्रस्तांच्या मदतीला आ. वायकर कोकणात गेले असताना त्यांनी मोरे यांच्या मुलाची भेट घेतली व लाखमोलाची मदत केली. जयवंत मोरे हे आमदार व माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिक होते. दरड पडण्याच्या दुर्घटनेत मोरे यांच्या बिरमणी येथील घराचे मोठे नुकसान झाले. मोरे यांचा मुलगा अनंत याला बिरमणी गावातील पडलेले घर पुन्हा बांधण्यासाठी सहाय्य व्हावे, यासाठी आमदार रवींद्र वायकर यांनी खेड येथे जाऊन रोख एक लाखाची मदत केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:17 PM 02-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here