मिठगवाणेत गावठी बॉम्ब आढळल्याने खळबळ

0

राजापूर : दोन दिवसांपूर्वी माडबन मिठगवाणे परिसरातील सड्यावर गुरे चरविण्यासाठी गेलेल्या एका ग्रामस्थांला बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली. या बाबत गावच्या पोलिस पोलिसांमार्फत नाटे पोलिसांना तत्काळ खबर देण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील, पोलिस कर्मचारी विकास चव्हाण, फणसेकर, दिनेश कांबळे, दीपक काळे व अन्य यांच्यासहित तत्काळ माडबन मिठगवाणेकडे रवाना झाले. रत्नागिरी येथील बॉम्बशोधक व बॉम्बनाशक पथकाला याबाबत माहिती देण्यात आली होती. २९ जुलै २०२१ च्या सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर नाटे पोलिसानी श्वानपथक व बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाच्या मदतीने या ठिकाणी सापडलेल्या गावठी बॉम्ब ताब्यात घेतला. तो गावठी बॉम्ब असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी या परिसरात अजूनही काही गावठी बॉम्ब आहेत का, याचा शोध घेण्यासाठी दिवसभर संपूर्ण परिसर पिंजून काढला. या प्रकारचा गावठी बॉम्ब हा शिकारीसाठी वापरण्यात जात असल्याचे सांगण्यात आले आहे तर हा गावठी बॉम्ब सापडण्यापूर्वी दोन दिवस आधी या भागात शिकार झाल्याची कुजबूज परिसरात सुरु होती. दरम्यान, दोनच महिन्यांपूर्वी नाटे पोलिसांनी शिकारीसाठी जात असलेल्या काही जणांना मुद्देमालासह पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:50 PM 03-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here