चिपळूण पूरग्रस्तांना ८४ लाखांची तातडीची मदत

0

चिपळूण : चिपळुणात आलेल्या महापुराने पूर्ण शहर उद्ध्वस्त झाले. आता पूर ओसरल्यानंतर बारा दिवसांनी जनजीवन हळूहळू सुरळीत होत आहे. या अनुषंगाने येथील तहसील कार्यालयामार्फत पूरग्रस्तांना मदत वाटप करण्यात येत आहे. शहरालगतच्या बारा गावांना आणि शहरातील प्रभाग क्र.१ मधून मदत वाटप सुरू करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत ८३ लाख ९५ हजार रुपयांची तत्काळ मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमा होणार आहे. या बाबत महसूल यंत्रणेने कार्यवाही केली असून दोन दिवसांत बँक खात्यात रक्कम जमा होईल. त्यामुळे लोकांनी तहसील कार्यालयात गर्दी करू नये. उर्वरित पंचनामे करण्यात येतील, असे आवाहन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:54 AM 04-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here