नीलेश राणे आजपासून राजापूर दौऱ्यावर
राजापूर : लोकसभा व कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने यश संपादन केल्यामुळे कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसह होणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नियोजन सुरू झाले आहे. त्यासाठी भाजप येते माजी खासदार नीलेश राणे आजपासून (ता. ३) राजापूर दौऱ्यावर येत आहे. भाजप पदाधिकारी, बुथ अध्यक्षांना ते मार्गदर्शन करणार आहेत.
राजापूर नगर वाचनालय सभागृहात उद्या सकाळी १०.३० वा. भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे विजयी झाले तर नुकत्याच झालेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातही भाजपने बाजी मारली असून निरंजन डावखरे हे निवडून आले. त्यामुळे आता राजापूर विधानसभा मतदारसंघावर भाजपच्या पदाधिऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी पक्षसंघटन अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. माजी खासदार नीलेश राणे प्रथमच राजापुर दौऱ्यावर येत असल्यामुळे कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या वेळी राणे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला आघाडीच्या नेत्या उल्का विश्वासराव, भाजप जिल्ह्य सरचिटणीस रवींद्र नागरेकर आदी उपस्थित रहाणार आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे पूर्व मंडल ध्यक्ष भास्कर सुतार, पश्चिम मंडल अध्यक्ष सुरेश गुरव यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 03/Jul/2024
What's Your Reaction?