रत्नागिरीत गो मांसाची वाहतूक; अवशेष रस्त्यावर पडल्याने खळबळ

Jul 4, 2024 - 22:59
Jul 4, 2024 - 23:04
 0
रत्नागिरीत  गो मांसाची  वाहतूक; अवशेष रस्त्यावर पडल्याने खळबळ

रत्नागिरी, ता. ०४ : रत्नागिरीतून मोठ्या प्रमाणात गो मांसाची वाहतूक होत असल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. अशा प्रकारची वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून वासराचे अवशेष रस्त्यावर पडल्याने खळबळ उडाली. टीआरपी येथे हा प्रकार घडला. यामुळे मोठ्या प्रमाणात जमाव गोळा झाला असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

आज  रात्री 9:00 च्या सुमारास टीआरपी जवळ  एका टेम्पो तून लहान एका वासाराची मान रस्त्यावर  पडल्याची  धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिक येथे गोळा झाले असून पोलिस ही तात्काळ त्या ठिकाणी हजर झालेले.

रत्नागिरीत मोठ्या प्रमाणावर गो मांसाची वाहतूक होत आहे.  गेले तीन महिने काही नागरिक पोलिसांच्या संपर्कात आहेत. परंतु अद्यापही ठोस कारवाई झाली नाही.  आज घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रत्नागिरी शहरात आता राजरोजपणे गो मासांची वाहतूक होत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक 

धनंजय कुलकर्णी यांच्या आदेशानुसार नाकाबंदी करण्यात आली आहे. एमआयडीसीतील नव निर्माण कॉलेजच्या इथून हा टेम्पो गेल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जाते. त्यामुळे तेथे

मोठ्या प्रमाणात जमाव  गोळा झाला आहे. पोलीस ही या ठिकाणी उपस्थित आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow