Breaking : चिपळूण उड्डाण पुलाचं पीलर तोडताना पुन्हा एकदा अपघात

Jul 5, 2024 - 20:38
 0
Breaking  : चिपळूण उड्डाण पुलाचं पीलर तोडताना पुन्हा एकदा अपघात

चिपळूण : बहादुरशेख येथे १६ ऑक्टोबर २०२३ रोजी घडलेल्या अपघाताच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. महामार्गावर चौपदरीकरणा अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे पीलर तोडण्याची काम सुरू असतांना रोप तुटून त्यावर उभे असणारे तीन कामगार २० फुटावरून खाली कोसळले आहेत. हे दोन्ही कामगार जखमी झाले असून त्यानं उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही घटना आज सायंकाळी ६.३० च्या दरम्यान घडली. चिपळूणातील पुलाचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र या पुलाच्या कामात सुरुवातीपासूनच अडचणी येत आहेत. या पुलासाठी ४३ पीलर उभारण्यात आले असून पावसाळ्यात देखील हे काम सुरू आहे. १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचं काही भाग कोसळला होता. त्यामुळे पूर्वीच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आला असून ४० मीटरचे गाळे रद्द करुन २० मीटर वर नव्याने पीलर उभारले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आधीच्या पिलरच्या अतिरिक्त असलेल्या बाजू तोडल्या जात आहेत. हे काम सुरू असताना सदराचा अपघात घडला आहे. जखमी झालेल्या दोन्ही कामगारांच्या डोक्याला, कंबरेला आणि पायाला दुखापत झाली आहे. अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक थांबवल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow