मनोज जरांगेंनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, त्यांना एकदाचं कळून जाईल : बबनराव तायवाडे

Jul 10, 2024 - 11:48
 0
मनोज जरांगेंनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, त्यांना एकदाचं कळून जाईल : बबनराव तायवाडे

नागपूर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, लोकांचा किती पाठिंबा मिळतो हे एकदाच स्पष्ट होऊन जाईल, असा उपरोधिक टोला ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे (Babanrav Tayvade) यांनी लगावला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन आंदोलन मनोज जरांगे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून मराठा आरक्षण शांतता जनजागरण रॅलीमध्ये मनोज जरांगेंच्या मातृसत्ताक पद्धतीने जात निश्चिती करण्याची मागणी मागण्या पूर्ण करणे शक्य नसल्याचे सांगत सरकारही स्पष्ट काही सांगत नाही, ही खरी अडचण आहे, असेही ते म्हणाले.

सरकार स्पष्ट सांगत नाही म्हणून तर अडचण आहे- बबनराव तायवाडे

आता राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना हे स्पष्ट सांगण्याची वेळ आली आहे. मात्र राज्य सरकार स्पष्ट सांगत नाही म्हणून तर अडचण आहे, असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केले. राज्य सरकारने तीन निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे, त्यांच्याकडून कायदेशीर मत घेऊन राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत हे आता स्पष्ट सांगायला हवं. मात्र, मनोज जरांगे ना सरकार स्पष्ट काही सांगत नाही हीच मोठी अडचण असल्याचे तायवाडे म्हणाले.

मातृसत्ताक पद्धतीने जात निश्चितीची मागणी पूर्ण करणे अशक्य

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या असल्या तरी मातृसत्ताक पद्धतीने जात निश्चितीकरणाची मागणी पूर्ण करणे शक्य नाही, हे आता राज्य सरकारने तरंगे पाटील यांना स्पष्ट सांगावे अशी मागणी ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ तायवाडे यांनी केले. यावेळी राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षातील नेत्यांनी जायला हवं होतं. आपापलं मत मांडायला हवं होतं असं मतही यावेळी तायवाडे यांनी व्यक्त केले.

राजकीय लढ्यात तेवढा पाठिंबा मिळत नाही

सामाजिक प्रश्नावर आंदोलन करताना लाखोंनी आणि कोटींनी लोक सोबत येतात. मात्र राजकीय प्रश्नावर लोकांची भूमिका वेगवेगळी असते. त्यामुळे सामाजिक आंदोलनाच्या तुलनेत राजकीय लढ्यात तेवढा पाठिंबा मिळत नाही असेही ते म्हणाले. त्यामुळे मनोज जरांगे यांनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, त्यांना एकदा चेक करून जाईल की त्यांना किती पाठिंबा मिळतो, असा उपरोधिक टोलाही तायवाडे यांनी लगावला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 10-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow