कोकण रेल्वे ठप्प : ट्रॅक वरील चिखल बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू

Jul 10, 2024 - 13:39
 0
कोकण रेल्वे ठप्प : ट्रॅक वरील चिखल बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू

मुंबई : कोकण रेल्वे (Konkan Railway ) मार्गावरील गोवा पेडणे बोगद्यात (Goa Pedne tunnel) मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. याचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला आहे. कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प (stopped) झाली आहे.

सध्या 40 ते 45 टक्के चिखल बाजूला करण्याचं काम पूर्ण झालं आहे. दरम्यान, अजूनही 50 ते 55 टक्के चिखल बाजूला करण्याचं काम बाकी आहे.

कोकण रेल्वे प्रशासनाच्यावतीनं मोठ्या प्रमाणात बोगद्यातील चिखल बाजूला करुन पिशवीत भरुन ट्रेन च्या माध्यमातून बाहेर नेण्याचं काम सुरु आहे. त्यामुळं कोकण आणि गोव्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसला आहे. अजूनही ट्रॅक वरील चिखल बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:07 10-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow