राजधानी दिल्लीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

May 29, 2024 - 16:00
May 29, 2024 - 16:50
 0
राजधानी दिल्लीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत लोक उष्णतेने होरपळून निघाले आहेत. बुधवारी पारा ५२ अंशांच्या पुढे गेला आहे. दिल्लीत पारा ५० अंशांच्या पुढे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिल्लीत मंगळवारीही पारा ५० च्या जवळ पोहोचला होता.

दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेची लाट आणि अतिउष्णतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र बुधवारी उष्णतेने कहर केला. दुपारी अडीच वाजता दिल्लीत ५२.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.

दिल्लीत बुधवारी उष्णतेचे सर्व विक्रम मोडले गेले आहेत. पहिल्यांदाच दिल्लीत तापमान ५२ अंशांच्या पुढे गेलं. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिल्लीच्या मंगेशपूर भागात ५२.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. मुंगेशपुरमध्ये बुधवारी दुपारी २.३० वाजता५२ अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. मंगेशपूरचे तापमान ५२.३ अंश सेल्सिअस असताना सरासरी तापमान ४५.८ अंश होते. यामुळे दिल्लीतील नागरिकांना आपण भट्टीत राहतोय की काय असा अनुभव आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:15 29-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow