प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Jul 10, 2024 - 17:27
Jul 10, 2024 - 17:27
 0
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

राजापूर : नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतीला संरक्षण मिळावे, शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अवकाळी पाऊस, विविध वादळं आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तींचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतीतील संभाव्य धोका ओळखून या योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अनिल गावित यांनी केले आहे.

या योजनेमध्ये काही ठरावीक रक्कम भरून भातासह नागली पिकांचे विमा उतरविले जातात. या योजनेमध्ये जोखीमस्तर सर्व पिकांसाठी सत्तर टक्के ठेवण्यात आला आहे. पीकपेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, दुष्काळ, कीड व रोग आदींमुळे उत्पादनात होणारी घट, काढणीपश्चात नुकसान आदी निकषान्वये नुकसानीची छाननी करून विमा उतरविलेल्या नुकसानभरपाई दिली जाते. सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवावा, असे आवाहन गावित यांनी केले आहे.

पीक विमा हप्ता दर, संरक्षित रक्कम
प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये एक रुपयामध्ये पीक विमा उतरविता येत असून प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झाल्यास भाताला प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये तर नाचणीसाठी २० हजार रुपये विमा संरक्षित रक्कम ठेवण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:28 PM 10/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow