खेड : फुरूस परिसरात डेंग्यूसदृश आठ रुग्ण
खेड : तालुक्यातील फुरूस परिसरात आठ डेंग्यूसदृश रुग्ण सापडले असून, तालुक्यात डेंग्यू साथीने डोके वर काढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्या-त्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत असून, आवश्यक त्या उपाययोजनांचा अवलंब सुरू असल्याचे सांगण्यात आले.
शहरात डेंग्यूच्या साधीचा फैलाव होऊ नये, यासाठी नगर प्रशासनामार्फत 'डोअर टू डोअर' डास प्रतिबंधक फवारणीची मोहीम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे. डेंग्यूच्या साथीने डोके वर काढल्याने ग्रामस्थांतही धास्ती आहे. पावसामुळे साथीच्या आजारांनीही ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यात डेंग्यूच्या साथीची भर पडल्याने ग्रामस्थ मेटाकुटीस आले आहेत. आरोग्य यंत्रणेकडून केवळ सर्वेक्षण व जनजागृती करण्यावरच भर दिला जात आहे. फुरूस परिसरात डेंग्यू साथीचा फैलाव सुरू झालेला असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी वास्तव्य करत नसल्याने रुग्णांची हेळसांड सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 19/Jul/2024
What's Your Reaction?