संगमेश्वर : कडवई साळवीवाडी येथे जिल्हा परिषदेच्या शाळाची संरक्षक भिंत कोसळली
कडवई : संगमेश्वर तालुक्यातील कडवई साळवी वाडी येथील जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत कोसळून वर्ष झाले तरी संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. या शाळेच्या इमारतीपासून तीन ते चार फूट अंतर राहिले आहे. वेळेत भिंतीचे काम न केल्यास इमारतीला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दि. २५ जुलै २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळेची भिंत कोसळली आहे. यावेळी ग्रामस्थांनी पाठपुरावा करी हे काम तातडीने म. रां. रो. ह. योजनेमध्ये घेण्याची विनंती केली होती तसेच तालुकास्तरीय रोजगार हमी योजने मध्ये त्याला मंजुरी मिळावी अर्ज दिला होता. परंतु, गट शिक्षण अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे काम रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
संबंधित विभाग विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असून जर पाठपुरावा केला नाही तर १५ ऑगस्ट रोजी पालक, विद्यार्थी, आणि ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा कडवई ग्रामपंचायत माजी सरपंच वसंत उजगावकर यांनी दिला आहे. शाळेच्या कंपाऊंड वॉर्लसंदर्भात आयुक्त कार्यालयातून सक्त आदेश आहेत. तरीही आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 29/Jul/2024
What's Your Reaction?