मंडणगड : रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष

Jun 1, 2024 - 12:05
 0
मंडणगड : रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष

मंडणगड : पावसाला सुरुवात होण्यापूर्वी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील रस्ते खड्डेमुक्त करून, गटारे स्वच्छ करण्याच्या पालकमंत्र्यांचे आदेश असूनही स्थानिक पातळीवर मंडणगड नगर पंचायतीकडून खड्डे बुजवण्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. 

मंडणगड नगरपंचायत कार्यक्षेत्रात खड्डेमय रस्त्यांकडे नगरपंचायतीने लक्ष दिलेले नाही, साईडपट्टीचों तिच अवस्था असून सांडपाण्यामुळे त्रस्त नागरिकांना तक्रारी कराव्या लागत आहेत. नगरपंचायत कार्यक्षेत्रात बाणकोट रोड रस्ता, पाटरोड रस्ता, कोझर रस्ता हे मुख्य मार्ग असून बहुतांश रस्त्यांचे शेजारी असलेल्या गटारांचे रुंदीकरणाचे काम यंदा नगरपंचायत व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले होते. मात्र या दोन्ही विभागांनी रस्त्यातील खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहर परिसरातील रस्ते खड्डयांनी भरलेले आहेत ते बुजवण्यासाठी पाऊस तोंडावर आला तरी कोणी लक्ष दिलेले नाही.

साईडपट्टीची तीच अवस्था आहे, बांधण्यात न आलेले गटारे तुंबलेली आहेत व हाती येऊन काम पुर्ण करण्यात आलेल्या गटारांची यंदाच्या पावसात पहीली परीक्षा आहे. राज्याचे राजकारणात एकत्रित सतेत असतानाही सत्ताधारी व विरोधकांमधील संघर्ष येथील यंत्रणेस प्रभावीत करत आहे. शासन व प्रशासन यांनी संयुक्तपणे काम करून प्रश्न मार्गी लावत आहेत असे अभावानेच दिसते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 01/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow