नवरा माझा नवसाचा-2 सिनेमाचं पोस्टर लॉन्च

Aug 5, 2024 - 15:26
 0
नवरा माझा नवसाचा-2 सिनेमाचं पोस्टर लॉन्च

तब्बल 19 वर्षांनी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या 'नवरा माझा नवासाचा-2' (Navra Maza Navsacha 2) या सिनेमाची घोषणा झाली. त्यानंतर येत्या 20 सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

त्यामुळे प्रेक्षकांचीही उत्सुकता आता शिगेला पोहचलीये. त्यातच आता या सिनेमाचं पोस्टर नुकतच लॉन्च करण्यात आलं. सोशल मिडियावर सध्या या पोस्टरची बरीच चर्चा सुरु आहे.

सचिन पिळगांवकर यांनी सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर केलं आहे. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाची निर्मिती, कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या पोस्टरवर पहायला मिळत आहे, त्यामुळे प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन होणार यात शंका नाही.

19 वर्षांनी येणार सिनेमाचा सिक्वेल

सचिन पिळगावकर दिग्दर्शित "नवरा माझा नवसाचा" या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल 19 वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. येत्या 20 सप्टेंबर रोजी या सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. एस टी बस प्रवासात "नवरा माझा नवसाचा" चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता "नवरा माझा नवसाचा 2" चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे.

प्रेक्षकांचा लाडका कंडक्टर झाला TC

नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नवरा माझा नवसाचा या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची लालू कंडक्टरची भूमिका फार पसंतीस उतरली होती. ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. पण, नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात लालू कंडक्टर दिसणार नाही. पण, यामुळे प्रेक्षकांनी निराश होण्याचं कारण नाही. कारण, प्रेक्षकांच्या लाडका लालू कंडक्टर आता टीसी झाला आहे. अशोक सराफ यांचा नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटातील पहिला लूक समोर आला यामध्ये ते कंडक्टर ऐवजी तिकीट चेकरच्या भूमिकेत दिसत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:50 05-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow