चिपळुणात १८ ऑगस्टला 'चला करूया गणपती' कार्यशाळेचे आयोजन

Aug 7, 2024 - 15:59
 0
चिपळुणात १८ ऑगस्टला 'चला करूया गणपती' कार्यशाळेचे आयोजन

चिपळूण : संस्कार भारती उत्तर रत्नागिरी जिल्हा समिती व श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण यांच्यावतीने दि. १८ ऑगस्ट रोजी 'चला करूया गणपती' या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शहरातील बेंदरकर आळी येथील रा. स्व. संघाचे माधव बाग येथे होणार आहे.

संस्कार भारती वैविध्यपूर्ण कार्यक्रम करत असते. लहान मुलांना मातीचे गणपती कसे करतात याची ओळख होण्यासाठी 'चला करूया गणपती' ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. प्रशिक्षक म्हणून संतोष केतकर, सुनिल खेडेकर जबाबदारी सांभाळणार आहेत. या कार्यशाळेचे व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावे यासाठी दि. १० ऑगस्ट पर्यंत प्रवेश शुल्कासह नावनोंदणी करणाऱ्यांनाच यामध्ये सहभागी होता येईल. इयत्ता चौथीपासून पुढील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील. यासाठी साने गुरुजी उद्यानाशेजारी असणाऱ्या अक्षर साहित्य येथे नावनोंदणी करावी. प्रशिक्षणार्थीना माती पुरविण्यात येईल. पाच इंच बाय अर्धा इंच आकाराचे पातळ लाकडी कोरणे प्रत्येकाने आणावे. कोरणे एक बाजूला सरळ व दुसऱ्या बाजूला तिरके असावे. १ फूट १ फूट आकाराचा जाड पुठ्ठा किंवा प्लायवूड येताना बरोबर आणावा. त्यावर मूर्ती तयार करायची आहे. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. सहभागी प्रशिक्षणाथनी हजर रहावे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ प्रशिक्षण चालेल. येताना जेवणाचा डबा व पाण्याची बाटली सोबत आणावी.

दि. २५ ऑगस्ट रोजी मूर्तीचे रंगकाम शिकविले जाईल. त्या दिवशी प्रत्येकाने पोस्टर कलर, रंग करण्यासाठी डिश, पाण्यासाठी भांडे, ब्रश १ नं. व ८नं. चे आणावे. रंगवून झाल्यावर प्रत्येकाला आपण केलेली मूर्ती घरी घेऊन जायची आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:29 PM 07/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow