नारायण राणेंची आघाडी : आईला प्रेमाची मिठी देत उचलून घेत नितेश राणेंचं सेलिब्रेशन...

Jun 4, 2024 - 13:43
 0
नारायण राणेंची आघाडी : आईला प्रेमाची मिठी देत उचलून घेत नितेश राणेंचं सेलिब्रेशन...

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आघाडी घेतली आहे. दरम्यान, नारायण राणे यांनी आघाडी घेतल्यानंतर निलेश राणे यांनी त्यांच्या आईला प्रेमाने मिठी मारली आहे.

राणेंना आघाडी मिळाल्यानंतर निलेश राणेंनी आईच्या पाया पडत आशीर्वाद घेतला आहे. नारायण राणे यांनी आघाडी घेतल्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये जल्लोषाला सुरुवात झाली आहे.
 
नारायण राणे यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली होती.

नारायण राणेंच्या पराभवाची हॅटट्रीक करणार, असं विनायक राऊत यांनी म्हटलं होतं. मात्र, आता नारायण राणेंनी आघाडी घेतली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 04-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow