एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटणार? कृती समितीसोबत मुख्यमंत्री आज चर्चा करणार

Sep 4, 2024 - 10:59
Sep 4, 2024 - 11:00
 0
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटणार? कृती समितीसोबत मुख्यमंत्री आज चर्चा करणार

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मंगळवारी केलेल्या धरणे आंदोलनाचे संपात रूपांतर झाल्याने बससेवेला मोठा फटका बसला.

दिवसभरात ११,९४३ बसफेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन. २०१८ ते २०२४ पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीचा दर, ५८ महिन्यांची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी द्यावी, या मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कृती समितीबरोबर चर्चा करणार आहेत. ते योग्य निर्णय घेतील.
- उदय सामंत, उद्योगमंत्री

कुणाला त्रास देणे, हा आमचा उद्देश नाही. आमच्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवल्या आहेत. तोडगा निघेपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहणार आहे.
- श्रीरंग बर्गे, महाराष्ट्र एसटी संयुक्त कृती समिती

संपकरी कर्मचाऱ्यांवर एफआयआर
- कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटकाव करणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले आहेत.
- संपाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी बुधवारपासून दीर्घ काळासाठी करार पद्धतीने चालक व इतर आवश्यक कर्मचारी नेमण्यासाठी एसटी प्रशासनाची चाचपणी सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 04-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow