गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर रुग्णवाहिका
गुहागर : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण ते गुहागर येथे अपघातग्रस्तांच्या सेवेत रुग्णवाहिका दाखल झाली आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या या रुग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. ही सेवा पूर्णपणे विनामूल्य असून अपघातग्रस्तांसाठी देवदूत ठरणार आहे.
चिपळूण ते गुहागर मार्गावर तीन घाट परिसर आहेत. या भागात अपघातांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे ती मध्यवर्ती ठिकाणी देवघर येथील भारत पेट्रोलपंप प्रियंका ऑटोमोबाइल या ठिकाणी २४ तास सेवेत राहणार आहे. लोकापर्ण कार्यक्रमाला गुहागरचे गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, पोलिस निरीक्षक सचिन सावंत, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. निखिल जाधव, देवघर सरपंच विजया विजय जाधव, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप जाधव, डॉ. वसंत सकपाळ, राजेंद्र घोसाळकर व प्रदीप चव्हाण तर संस्थानतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कांबळी, राजन बोडेकर व स्वप्नील सकपाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी जिल्हा सेवा समितीतर्फे करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पी. डी. जाधव, जिल्हा निरीक्षक संदीप नार्वेकर, सुलोचना कोठावळे, प्रतीक चौगुले, प्रसाद शिवणेकर, धनश्री मांजरेकर, दीपक तावडे आदींनी हा कार्यक्रम यशस्वी केला.
राज्यात विविध महामार्गावर सुविधा
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानने सामाजिक बांधिलकीतून मुंबई-गोवा, मिऱ्या-नागपूर या राष्ट्रीय महामार्गांसह राज्यात विविध महामार्गांवर मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. त्यामुळे या महामार्गावर होणाऱ्या अपघातामधील जखमींना तातडीने प्राथमिक उपचार मिळत आहेत. संस्थानच्या रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी जीवदान देत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:08 04-09-2024
What's Your Reaction?