अनंत चतुर्दशीला समुद्राला मोठे उधाण
मुंबई : मुंबईत अनंत चतुर्दशीला मोठ्या संख्येने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांसह घरगुती बाप्पांचे विसर्जन होते. याच दिवशी समुद्राला मोठे उधाण असून, सकाळी ११.१४ वाजता ४.५४ मीटर, तर रात्री ११.२४ वाजता ४.३९ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
मुंबईत नैसर्गिक तलावासह कृत्रिम तलाव व गिरगाव चौपाटी, दादर, माहीम, जुहू, सात बंगला, वेसावे, गोराई आदी चौपाट्यांवर गणेशमूर्ती विसर्जन केले जाते.
अनंत चतुर्दशीला समुद्राला मोठे उधाण असल्यामुळे विसर्जनामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने आतापासूनच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भरतीच्या वेळी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:07 04-09-2024
What's Your Reaction?