लायन्स क्लब रत्नागिरी तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Sep 4, 2024 - 15:43
 0
लायन्स क्लब रत्नागिरी तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : दरवर्षीप्रमाणे लायन्स क्लब रत्नागिरी तर्फे दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.

यावर्षीच्या शिक्षण समिती अध्यक्ष एम जे एफ ला शिल्पा पानवलकर, अध्यक्ष श्री गणेश धुरी व शिक्षण समिती पुढील शिक्षकांना पुरस्कार देणार आहेत. कै ल ग पटवर्धन स्मृती प्रित्यर्थ एम जे एफ पटवर्धन सर पुरस्कृत महाविद्यालयीन विभागात डॉक्टर अपर्णा मिलिंद कुलकर्णी सायन्स विभाग हायस्कूल विभागात, सौ अंजली संतोष पिळणकर , अ.के. देसाई हायस्कूल प्राथमिक विभागात, सौ प्राजक्ता कदम कृ. ची.आगाशे विद्यामंदिर यांना गौरविण्यात येणार आहे.

विशेष पुरस्कारांमध्ये पै हुसेन आदमखान फडणाईक स्मृती प्रित्यर्थ ला एम जे एफ एडवोकेट शबाना वस्ता पुरस्कृत महंमद जुबेर आदम गडकरी मिस्त्री हायस्कूल यांना देण्यात येणार आहे. कै. राजश्री दत्तात्रय गडकरी स्मृती प्रित्यर्थ ला एमजे एफ शिल्पा पानवलकर पुरस्कृत मंजिरी मिलिंद करंदीकर परशुराम पंत अभ्यंकर बालमंदिर यांना देण्यात येणार आहे. कै.अलका दिवाकर देव स्मृतिप्रित्यर्थ एमजे एफ ला डॉक्टर शिवानी पानवलकर पुरस्कृत सौ सोनाली संजय पाटणकर जी.जी.पीएस यांना देण्यात येणार आहे. कै.अविनाश शिवराम मोरे स्मृतिप्रीत्यर्थ ला. साक्षी धुरी पुरस्कृत श्री भूषण अनंत बेलवलकर पॉलिटेक्निक कॉलेज यांना देण्यात येणार आहे. 

सर्व पुरस्कार विजेत्या शिक्षकांचे लायन्स क्लब कडून अभिनंदन करण्यात येत आहे. गणपती सुट्टी असल्यामुळे पुरस्कार वितरण सोहळा गणपती विसर्जनानंतर कऱण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:13 04-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow