देवरूखच्या श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे खुली लेख स्पर्धा
रत्नागिरी : देवरूख येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाने माजी ग्रंथपाल स्व. ल. वा. साने गुरुजी यांच्या स्मरणार्थ सातव्या खुल्या लेख स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेसाठी दोन विषय निश्चित करण्यात आले आहेत. ते असे - १.दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे, २. धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव ....अपेक्षा आणि वास्तव
दोन्ही विषयातील लेखांसाठी पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे १०००, ७५० आणि ५०० रुपयांची बक्षिसे आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. लेखासाठी शब्दमर्यादा किमान १२०० आणि कमाल १५०० शब्द अशी आहे. लेख पाठविण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०२४ ही आहे.
स्पर्धेविषयीच्या अधिक माहितीसाठी ९४२३२९७३५८ या मोबाइलवर संपर्क साधावा, असे आवाहन वाचनालयाच्या अध्यक्षांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:48 04-09-2024
What's Your Reaction?