Bigg Boss OTT 3 ची तारीख समोर; अनिल कपूर होस्टची धुरा सांभाळणार

Jun 6, 2024 - 15:25
 0
Bigg Boss OTT 3 ची तारीख समोर; अनिल कपूर होस्टची धुरा सांभाळणार

रिएलिटी शो बिग बॉस ओटीटी च्या तिसऱ्या सिझनची सर्वांनाच उत्सुकता आहे. गेल्या वर्षभरापासून सीझन ३ ची चर्चा सुरु आहे. नुकतंच शोचा नवा प्रोमो आला आहे ज्यामुळे चाहते आणखी आतुर झाले आहेत.

दरम्यान यावेळी सलमान खान नाही तर अनिल कपूर (Anil Kapoor) होस्टची धुरा सांभाळणार आहे. आज मेकर्सने चाहत्यांना सरप्राईज देत अनिल कपूरचा पहिला लूक शेअर केला आहे.

बिग बॉस ओटीटी 3 कधी सुरु होणार?

मेकर्सने आज बिग बॉस ओटीटी 3 चा फर्स्ट लूक शेअर करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. 'प्रेझेंटिंग अनिल कपूर बिग बॉस OTT 3 चा नवीन होस्ट! मोठा पडदा गाजवल्यानंतर आता अनिल कपूर बिग बॉस हाऊसमध्ये सत्ता गाजवणार आहे. एक्स्ट्रा कुछ खास! २१ जून पासून अनिल कपूरची जादू बघायला मिळणार आहे."

जिओ सिनेमाने ही पोस्ट शेअर करत अनिल कपूरचा लूक रिव्हील केला आहे. यामध्ये तो एकदम सीरियस लूकमध्ये दिसून येतोय. अनिल कपूरला होस्टिंग करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

रिपोर्टनुसार, अनिल कपूर या शोबद्दल म्हणाला,"बिग बॉस ओटीटी आणि मी ही एक ड्रीम टीम आहे. शो आणि मी दोघंही तरुण आहोत आणि लोक मजेत म्हणतात की माझं वय दिवसेंदिवस कमीच होत चाललंय पण बिग बॉसचंही हेच वैशिष्ट्य आहे. असं वाटतंय की परत शाळेत जावंस काहीतरी नवीन आणि रोमांचक करावं. मी बिग बॉसची हीच ऊर्जा आणखी १० पट करणार आहे. यात मी माझी चव आणण्यासाठी आणखी वाट बघू शकत नाही."

दरम्यान यंदा बिग बॉस ओटीटी 3 मध्ये कोण कोण स्पर्धक सहभागी होणार हे लवकरच स्पष्ट होईल. शहजादा धामी, अरमान मलिक, रॅपर आरसीआर, खुशी पंजाबन यांच्या नावाची सध्या चर्चा आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow