T20 World Cup 2024 : सुपर 8 फेरीत कोणते संघ मिळवणार जागा?

Jun 10, 2024 - 15:18
 0
T20 World Cup 2024 : सुपर 8 फेरीत कोणते संघ मिळवणार जागा?

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत एकूण 20 संघांनी भाग घेतला आहे. एका गटात पाच संघ असे चार गट आहेत. प्रत्येक संघ एकूण 4 सामने खेळणार आहे. त्यात टॉपला असलेल्या दोन संघांना सुपर 8 फेरीचं तिकीट मिळणार आहे.

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आठ दिग्गज संघांची नाव चर्चेत होती. मात्र स्पर्धेतील साखळी फेरी मध्यात आल्यानंतर चित्र वेगळंच दिसत आहे. साखळी फेरीत मोठे उलटफेर झाल्याने आता दिग्गज संघांचा सुपर 8 फेरीचा मार्ग खडतर झाला आहे. प्रत्येक संघाने जवळपास 2 सामने खेळले आहेत. त्यामुळे उर्वरित एक दोन सामन्यात चित्र स्पष्ट होईल. मात्र सध्याची स्थिती पाहता काही संघांना साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागणार आहे. पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंका या सारख्या दिग्गज संघांची पुढची वाट बिकट झाली आहे. सध्याची स्थिती पाहता कोणत्या गटातून कोणते दोन संघ सुपर 8 फेरी गाठू शकतात याबाबत जाणून घेऊयात

अ गटात भारतासह अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान आणि आयर्लंड हे संघ आहेत. भारत आणि अमेरिका यांनी सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्याने सुपर 8 फेरीचा मार्ग मोकळा दिसत आहे. उर्वरित दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवला की सुपर 8 फेरीचं गणित पक्कं होईल. दुसरीकडे कॅनडा, पाकिस्तान आणि आयर्लंड या संघांचं गणित जर तरवर अवलंबून आहे. भारत आणि अमेरिकेच्या कामगिरीवर पुढचं गणित ठरेल. अमेरिकेने पुढचा एक सामना जिंकला की पाकिस्तानचा सुपर 8 फेरीतील पत्ता कट होईल.

ब गटात सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. या गटात स्कॉयलँड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, इंग्लंड आणि ओमान हे संघ आहे. सुरुवातीला या गटातून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्वॉलिफाय करतील असं वाटत होतं. पण घडलं काही विचित्रच.. या गटात स्कॉटलँडने जबरदस्त कामगिरी केली आहे. तर ऑस्ट्रेलियाने दोन पैकी दोन सामने जिंकत सुपर 8 च्या दिशेने कूच केली आहे. या गटातून ओमानचा पत्ता कट झाला आहे. इंग्लंडची पुढची वाट खूपच बिकट झाली आहे. या गटातून स्कॉटलँड आणि ऑस्ट्रेलिया सुपर 8 फेरीत स्थान मिळवू शकते.

क गटातही असंच काहीसं चित्र आहे. या गटात अफगाणिस्तानने दोन पैकी दोन सामने जिंकत सुपर 8 फेरीच्या दिशेने कूच केली आहे. वेस्ट इंडिजनेही दोन सामने जिंकत आपला दावा दाखल केला आहे. तर युगांडाने एका सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकेड पापुआ न्यू गिनी आणि न्यूझीलंड या संघांना खातं खोलता आलेलं नाही.

ड गटात सुपर 8 फेरीत स्थान मिळवण्यासाठी खिचडी झाली आहे. त्यातल्या त्यात दक्षिण अफ्रिका आमि बांगलादेश हे संघ पात्र ठरू शकतात असं चित्र आहे. नेदरलँडचाही सुपर 8 साठी धडपड आहे. तर नेपाळ आणि श्रीलंकेला आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात विजयी खातं खोलता आलेलं नाही. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात सर्वकाही चित्र स्पष्ट होईल. यात दिग्गज संघांना बाहेरचा रस्ता मिळाला तर आश्चर्य वाटायला नको.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:29 10-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow