सौदी अरेबियाची मोठी घोषणा, २०६० पर्यंत बनणार ‘झीरो कार्बन उत्सर्जन’ करणारा देश

0

जगातील सर्वात मोठा तेल निर्यात देश म्हणून ओळख असलेल्या सौदी अरेबियानं आता झीरो कार्बन उत्सर्जनावर भर देणार असल्याची घोषणा केली आहे. ग्लासगो, स्कॉटलँडमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या जागतिक हवामान परिषदेपूर्वीच सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी याबाबतची माहिती जाहीर केली आहे. २०६० सालापर्यंत सौदी अरेबियाचा झीरो कार्बन ग्रीन हाऊसमध्ये समावेश होईल, असा दावा त्यांनी केला आहे. जगाला हवामान बदलाच्या धोक्यांपासून वाचविण्यासाठी अनेक देश एकत्र आले असून झीरो कार्बन उत्सर्जन मोहिमेत सहभाग घेतला आहे. यात आता सौदी अरेबियानंही मोठ्या प्रमाणात काम करण्याची तयारी केली आहे. नेट झीरो कार्बन मिशनचा उद्देश सौदी अरेबियाला आता तेल उत्पादन बंद करावं लागणार असा नाही. तर यूनायटेड नेशन्सच्या अकाऊंटिंग नियमांनुसार सौदी अरेबियातून निर्यात होणाऱ्या तेलामुळे परदेशांमध्ये जितकं कार्बन निर्माण होणार त्यासाठी सौदी अरेबिया जबाबदार असणार नाही. सौदी अरेबियात जितका कार्बन उत्सर्जन होत आहे त्याचं प्रमाण शून्यावर आणण्याचा संकल्प मोहम्मद बिन सलमान यांनी केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:59 PM 23-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here