जिल्हा शासकीय रुग्णालयातील त्या अर्भकांच्या संभ्रमामुळे होणार डीएनए टेस्ट

0

रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेचे अर्भक बदलल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली. बाळाच्या वडिलांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यानुसार बोल्डे यांनी याच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. डीएनए चाचणीसाठी रक्त नमुने मुंबईला पाठविण्यात येणार आहेत. त्याचा अहवाल पाच दिवसांत अपेक्षित आहे. तोपर्यंत दोन्ही मुले जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात येणार आहेत. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शुक्रवारी प्रसूतीसाठी चांदोर-तळीवाडी येथील मंगेश फटकरे यांची पत्नी दाखल झाली होती. शनिवारी सकाळी सिझर होऊन मुलगा झाल्याचे रुग्णालयातून आई व नातेवाईक यांना सांगण्यात आले. तो मुलगा दाखविला, मुलगा झाल्याचा केसपेपर व तशी नोंदही केली. मात्र, तासाभरात घाबरत घाबरत सिस्टर आल्या व त्यांनी तुम्हाला मुलगा नाही, तर मुलगी झाल्याचे फटकरे यांच्या नातेवाईकांना सांगितले. मात्र, नातेवाईकांनी ते मान्य केले नाही. याप्रकरणी संतप्त पती व नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ, अशोक बोल्डे यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर याबाबत डीएनए टेस्ट करण्याचे आश्वासन डॉ. बोल्डे यांनी दिले.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here