नाशिक : मी शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या आठवड्यात माध्यमांशी बोलताना केले होते. त्यास शिवसेना खा.संजय राऊत यांनी दुजोरा दिला. छगन भुजबळ बरोबर बोलताय ते मुख्यमंत्री झाले असते असे ते म्हणाले. शिवसेना भवन येथे ते पत्रकारांशी बोलत होते. मागील आठवड्यात वाढदिवसाच्या पार्श्वभुमीवर मीडियाशी संवाद साधताना भुजबळ यांनी मंडल आयोगासाठी आपण शिवसेना सोडली व पवारांना साथ दिली असे विधान केले होते.पवारांनी मला उपमुख्यमंत्री पद दिले. मुख्यमंत्री पदाची अजिबात इच्छा नाही असे देखील भुजबळ म्हणाले. हाच धागा पकडत सेना नेते खा.राऊत यांना विचारले असते ते देखील म्हणाले छगन भुजबळ बरोबर बोलतायत ते मुख्यमंत्री झाले असते.मात्र दुर्दैव असे आहे की दुसरीकडे गेले.ते शिवसेनेत असते तर नक्कीच आज आहे त्या पेक्षा मोठ्या पदावर राहिले असते हे सांगायला ते विसरले नाही.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:50 PM 23-Oct-21
