‘भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची जागा आर्थर रोड जेलमध्ये’; भाजप आमदाराचे खळबळजनक वक्तव्य

0

नांदेड : राज्य सरकारला आरोग विभागाच्या परीक्षांचे नियोजन करता आलं नाही, परीक्षा वेळेवर होतील असं सांगणाऱ्या आरोग्यमंत्र्यांनी आदल्या दिवशी रात्री 10 वाजता परीक्षा रद्द केली. त्यामुळे भविष्यात त्यांची जागा ही आर्थर रोड जेलमध्ये असेल अशी सनसनाटी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे. ते देगलूर बिलोली निवडणूक प्राचारार्थ बोलत होते. भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, “राज्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षेवेळी आरोग्य मंत्र्याना परीक्षेचे योग्य नियोजन करता आले नाही. विद्यार्थ्यांना वेळेवर हॉल तिकीट मिळाले नाही, परीक्षा केंद्राचा पत्ता, जिल्ह्यात नाही तर राज्य सोडून परराज्यात आणि देशाच्या बाहेरही आले होते. तर एक दिवस अगोदर वेळेवर परीक्षा होईल असे म्हणणाऱ्या आरोग्य मंत्र्यांनी रात्री 10 वाजता आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाली असे सांगून लाखों विद्यार्थ्यांचे नुकसान केले. त्यामुळे कोरोना काळात परीक्षेसाठी उपस्थित राहण्यासाठी खेड्या-पाड्यातून निघालेल्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. अशा पद्धतीने वागणाऱ्या ह्या आरोग्य मंत्र्याची जागा ही भविष्यात आर्थर रोड जेलमध्ये असेल. “

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:51 PM 23-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here