माणसाला बसवली डुकराची किडनी

0

वॉशिंग्टन : अमेरिकेतील डॉक्टरांनी एका व्यक्तिला डुकराची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात यश मिळाल्याची माहिती दिली आहे. या यशामुळं अवयवदानाची कमतरता पूर्ण करण्यासाठी एक मोठा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. ज्या व्यक्तीला डुकराची किडनी ट्रान्सप्लान्ट करण्यात आली आहे, तो ब्रेन डेड होता. म्हणजेच तो आधीच जीवन रक्षक प्रणाली (व्हेंटिलटर) वर होता आणि तो ठिक होण्याची काहीही शक्यता नव्हती. मानवी शरिरानं किडनीला बाह्य अवयव म्हणून नाकारू नये, म्हणून जेनेटिकली मॉडीफाय केलेल्या डुकराची किडनी या व्यक्तीला लावण्यात आली. मात्र अद्याप या प्रत्यारोपणाबाबत माहिती घेण्यात आलेली नाही, किंवा त्याबाबत माहिती प्रकाशितही करण्यात आलेली नाही. मात्र हा आतापर्यंतचा सर्वांत विकसित प्रयोग असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशा प्रकारच्या चाचण्या आधीही घेण्यात आल्या होत्या मात्र मानवावर अशी चाचणी झाली नव्हती. अवयव प्रत्यारोपणासाठी डुकराचा वापर करणं ही काही अगदीच नवी कल्पना नाही. डुकरांच्या हृदयातील वॉल्व्हचा वापर पूर्वीपासूनच मानवांसाठी करण्यात आलेला आहे. आकाराचा विचार करता, डुकरांचे अवयव मानवी अवयवांशी मिळते-जुळते असतात. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी लॅन्गोन हेल्थ मेडिकल सेंटरमध्ये डॉक्टरांनी डुकराची किडनी काम करते की मानवी शरिर ती नाकारतं हे पाहण्यासाठी आजारी व्यक्तीच्या रक्तवाहिन्यांना जोडून पाहिली. त्यानंतर अडीच दिवस त्यावर बारकाईनं लक्ष ठेवलं आणि अनेक प्रकारच्या तपासण्या केल्या.

HTML tutorial

“ही किडनी मानवी किडनी ट्रान्सप्लान्टसारखीच काम करत असल्याचं आमच्या लक्षात आलं. ही किडनी अगदी व्यवस्थित काम करत होती, आणि शरिर ती नाकारेल असं वाटलंच नाही,” असं प्रमुख संशोधक डॉक्टर रॉबर्ट माँटगोमेरी यांनी एका कार्यक्रमात सांगितलं.
डॉक्टर माँटगोमेरी यांचंही ट्रान्सप्लांट झालं आहे. अवयवांसाठी वाट पाहणाऱ्या लोकांसाठी अधिकाधिक अवयवांची गरज आहे. मात्र असं असलं तरी हे काम वादग्रस्त असल्याचंही, त्यांनी मान्य केलंय.
“मला काळजी समजू शकते. सध्या ट्रान्सप्लान्टसाठी वाट पाहणारे सुमारे 40 टक्के रुग्ण हे अवयव मिळेपर्यंत मृत पावलेले असतील, असं मला वाटतं. आपण अन्न म्हणून डुकराचं मांस वापरतो, औषधांमध्ये डुकरांचा वापर होतो. वॉल्व्हदेखील वापरतो, त्यामुळे यात काही वाईट आहे, असं मला वाटत नाही,” असंही ते म्हणाले.
हा शोध अजूनही प्राथमिक पातळीवर आहे. त्यासाठी अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. मात्र, त्याचवेळी यामुळं याची वैद्यकीय चाचणी घेण्यासंदर्भात एक विश्वास निर्माण झाला आहे, असं डॉक्टर माँटगोमरी म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:04 PM 23-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here