आयपीएल मोसमातील पहिला सामना खेळण्याची मुंबई इंडियन्सला 7 व्यांदा संधी

0

इंडियन प्रीमीयर लीगच्या(आयपीएल) 13 व्या मोसमाला मुंबईतून प्रारंभ होणार आहे. आयपीएल 2020चे साखळी सामन्यांचे वेळापत्रक शनिवारी(15 फेब्रुवारी) जाहीर करण्यात आले आहे. या मोसमातील पहिला सामना 29 मार्चला गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यामुळे मुंबई संघाच्या नावावर एक मोठा विक्रम झाला आहे. आत्तापर्यंत आयपीएल मोसमातील पहिला सामना खेळण्याची मुंबई इंडियन्सला 7 व्यांदा संधी मिळाली आहे. तर चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल मोसमातील पहिला सामना खेळण्याची 6 वी वेळ असणार आहे. त्यामुळे सर्वाधिकवेळा आयपीएल मोसमातील पहिला सामना खेळण्याची संधी मिळण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर झाला आहे. तसेच याआधी कोलकाता नाईट रायडर्सनेही 6 वेळा आयपीएल मोसमातील पहिला सामना खेळला आहे. त्यामुळे चन्नई सुपर किंग्सने या यादीत कोलकाताची बरोबरी केली आहे. आत्तापर्यंत आयपीएलमध्ये मोसामीतील पहिला सामना किमान एकदा तरी खेळण्याचा मान एकूण 8 संघांना मिळाला आहे. यामध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स बरोबरच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, डेक्कन चार्जर्स, दिल्ली डेअरडेविल्स(आत्ताची दिल्ली कॅपिटल्स), रायझिंग पुणे सुपरजायंट आणि सनरायझर्स हैद्राबाद यांचा समावेश आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here