रत्नागिरी : शहरातील कोकण नगर येथील उद्यानाला नवा साज देण्यात फैसल मुल्ला यांना यश आले आहे. या भागात मोजून एकच उद्यान आणि या उद्यानाची पुरती दुरवस्था झाली होती. उद्यानात घाणीचे साम्राज्य होते. प्लस्टिकच्या बॉटल, सांडपाणी वाहत होते. उद्यानातील घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी फैसल मुल्ला यांनी एक नियोजन आखले. या नियोजनानुसार काम करत येथील उद्यानाला नवा साज मिळवून देत येथील नागरिकांची मोठी अडचण दूर केली आहे.
कोकण नगर प्रभाग क्र.४ येथे लहान मुलांसाठी मोजून एखादे उद्यान आहे. मात्र या उद्यानाची पुरती वाताहत झाली होती. उद्यानात सुमारे घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने अनेकवर्ष वापराविना होते. त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशी खूप त्रास सहन करावा लागत होता. आपल्या भागात उद्यान असून देखील मुलांना इतर ठिकाणी जाऊन खेळावे लागत होते. इतर ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांचा वेळ वाया जात होता. येथील नागरिकांनी ही बाब स्थानिक समाजसेवक फैसल मुल्ला यांच्या कानावर घातली. फैसल मुल्ला यांनी 2 ते 3 महिन्यात उद्यानातील घाणीचे साम्राज्य हटवून उद्यानाचे सुशोभीकरण करू असा शब्द स्थानिकांना दिला. दिलेल्या शब्दानुसार त्यांनी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांची भेट घेत उद्यान सुशोभीकरणाचा आराखडा दिला. नगराध्यक्ष साळवी यांनी देखील उद्यान दुरुस्ती आणि सुशोभीकरण करण्यासाठी निधी मंजूर करून दिला. उद्यान सुशोभीकरणाचे काम तातडीने सुरू झाले आहे. त्यामुळे कोकण नगर वासियांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. फैसल मुल्ला यांच्याशी या बाबतची विचारणा केली असता या दुरुस्ती आणि सुशोभीकरण कार्याला निधी मंजूर करण्यासाठीचे संपूर्ण श्रेय ना. श्री.उदय सामंत, नगराध्यक्ष श्री.बंड्या साळवी, उद्योजक श्री.किरण सामंत यांना दिले आहे. यापुढे कोकणनगर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अशा विकास कामांची किंवा अन्य सहकार्याची गरज भासल्यास आपण सदैव आपल्या पाठीशी उभे राहून कामे मार्गी लावु असा शब्द मुल्ला यांनी स्थानिक नागरिकांना दिला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
9:28 AM 24-Oct-21
