आता व्हॅगनआर कुणाला मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष
रत्नागिरी : रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ आयोजित भव्य बक्षीस योजनेचा दुसरी सोडत आज काढण्यात आली. मागील आठवड्यात स्थानिक बाजारपेठेत खरेदी करणाऱ्या ग्राहकांमधून तीन भाग्यवान ग्राहक निवडून त्यांना फ्रीज, वॉशिंगमाधीन व बेड हि बक्षिसे देण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या सोडतीत अनिल राहटे, माजगाव रोड यांना फ्रीज बक्षीस मिळाले. त्यांना बी सी ओसवाल, रामआळी या दुकानातून खरेदी केलेल्या मालावर कुपन मिळाले होते. स्नेहा स्वप्नील कीर, पालशेत गुहागर यांनी सोहन क्लॉथ स्टोअर्स राम आळी येथून खरेदी केली होती. त्यांनी मिळालेल्या कुपनवर वॉशिंग मशीन बक्षीस मिळाले आहे. तर पूजा दीपक पवार या रत्नागिरीच्या राहणाऱ्या असून त्यांनी जय भारत दुकानात खरेदी केलेल्या मालावर मिळालेल्या कुपनवर बेड बक्षीस जिंकलं आहे. रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या भव्य बक्षीस योजनेला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या बक्षीस योजनेनुसार योजनेत सहभागी झालेल्या स्थानिक दुकानातून खरेदी केल्यास ग्राहकांना लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. मागील आठवड्यात एका ग्राहकाला १ दुचाकी गाडी तर दोन ग्राहकांना एलईडी टीव्ही बक्षीस मिळाले होते. अजूनही लाखो रुपयांची बक्षिसे या योजनेत असून जानेवारी महिन्यात काढण्यात येणाऱ्या सोडतीत ग्राहकांना व्हॅगनआर कार जिंकण्याची संधी मिळणार आहे. ग्राहकांनी जास्तीत जास्त खरेदी योजनेत सहभागी झालेल्या दुकानातून करून लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकावीत असे आवाहन रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:57 AM 24/Oct/2021
